Mothers Day
Mothers Day Saam tv
महाराष्ट्र

Mothers Day: पवित्र स्थळावरील पाण्याने धुतले आईचे पाय

भूषण अहिरे

धुळे : स्वामी तिन्हीं जगाचा आई विना भिकारी..आईची जागा कोणीही कोणत्याही प्रकारे घेऊ शकत नाही. आई ही सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे. मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही अन्‌ मातेइतके प्रिय कुणीही नाही. अशा सर्वांपेक्षा महती मोठी असलेल्‍या आईबाबतची कृतज्ञता व्‍यक्‍त करण्यासाठी जागतिक मातृ दिनाचे (Mother) औचित्य साधत पवित्र स्थळावरील पाण्याने आईचे चरण धुतले. (dhule news international mothers day celebration)

जागतिक मातृदिन संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जात असताना जागतिक मातृदिनाचे औचित्य साधत आज धुळे (Dhule) शहरात मातृ वंदन सोहळ्याचे आयोहन खान्देश तेली समाज मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते. मातृदिनाच्या या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने तेली बांधव एकत्र जमले बघावयास मिळाले. यावेळी प्रत्येक मुलाने आपल्या आईचे पाय पवित्र पाण्याने धुऊन आशीर्वाद घेतले. तेली समाज बांधवांनी मातृदिनाच्या दिवशी जोपासलेली परंपरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

कोरोनामुळे मृतांच्‍या वारसांनाही मदत

कोरोना (Corona) काळामध्ये तेली समाज बांधवांमधील ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा उपक्रम देखील राबवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

Chilled Water: फ्रीजशिवाय थंड पाणी कसं प्यायचं?

Narendra Modi Sabha: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, PM मोदी दिवसभरात घेणार ४ सभा, कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT