Poultry Form Saam tv
महाराष्ट्र

अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय पुन्हा धोक्यात; चिकन, अंडी खाण्यास उपयुक्तच

अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय पुन्हा धोक्यात; चिकन, अंडी खाण्यास उपयुक्तच

साम टिव्ही ब्युरो

धुळे : अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय पुन्हा डबघाईला येण्याचे संकेत आहेत. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शरीरासाठी पौष्टिक आहार म्हणून चिकन, अंडी खावीत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे यांनी केले. (dhule news Poultry business threatened again by bird flu rumors)

कोरोना (Corona) विषाणूसंबंधी विविध अफवांमुळे ग्राहकांनी चिकन, अंडी खाणे कमी केल्यामुळे विक्रीत मोठी घट झाली होती. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय (Poultry Form) धोक्यात आला आहे. मात्र, शरीरासाठी पौष्टिक आहार म्हणून चिकन व अंडी खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर कुठेतरी पोल्ट्री व्यवसायला पुन्हा उभारी मिळाली होती. या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला होता. त्यापाठोपाठ आता पालघर आणि ठाण्यात बर्ड फ्लूचा (Bird Flu) शिरकाव झाल्याची वार्ता समोर आल्यानंतर प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत त्यावर उपाययोजना करून मात केली. मात्र, राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची अफवा पसरवल्यामुळे पुन्हा एकदा पोल्ट्री व्यावसायिकांच्या डोळ्यासमोर उपासमारीचे संकेत दिसून येत आहेत.

उत्‍तर महाराष्‍ट्रात बर्ड फ्लू नाही

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह इतर कुठल्याही जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. जिल्ह्यात (Dhule News) वेळोवेळी पथकाच्या माध्यमातून पक्ष्यांचे नमुने, सर्वेक्षण केले जात असून, अद्याप जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. त्यामुळे चिकन व अंडी शरीरासाठी पौष्टिक व पोषक असल्याने त्याचा आहारात समावेश करावा, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विसावे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. तसेच ग्राहकांनी व नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष विशाल ठाकूर यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lawyer-Judge verbal spat: डोन्ट क्रॉस द लिमिट! वकिलानं न्यायाधीशांना रोखठोक सुनावलं, हायकोर्टातच ड्रामा

Eyeliner Tips: आयलायनर लावण्यासाठी सोप्या टिप्स; डोळ्यांना द्या परफेक्ट लूक

Prarthana Behere Photos: कपाळी टिकली अन् नाकात नथनी, अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा सुंदर साज

Mumbai Crime : मुंबईत २० हून अधिक घरे, शेकडो भक्त; किन्नरांच्या गुरुला अटक, बांग्लादेश कनेक्शन उघड

Maharashtra Live News Update: मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांचे मंचावर आगमन.

SCROLL FOR NEXT