...त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरने आवश्यक - नितीन राऊत

जर चुकीचं बिल असेल तर दुरुस्त करू पण विजबिल भरल्याशिवाय आम्ही वीज देऊ शकत नाही
Nitin Raut
Nitin Raut Saam TV
Published On

बुलढाणा - ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यात नवीन उभारलेल्या मलकापूर व शेगाव तालुक्यातील पॉवर हाऊसच ऑनलाईन उद्घाटन केलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.

आम्हाला वीज विकत घ्यावी लागते, आम्ही वीज तयार करीत नाही जी कंपनी वीज निर्मिती करते तीला कोळसा विकत घ्यावा लागतो कर्मचाऱ्यांचे पगार दयावे लागतात त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरने आवश्यक आहे. जर चुकीचं बिल असेल तर दुरुस्त करू पण विजबिल भरल्याशिवाय आम्ही वीज देऊ शकत नाही असे नितीन राऊत म्हणाले.

हे देखील पहा -

पुढे नितीन राऊत म्हणाले की, यात नाविन्यपूर्ण काय आहे, अनेक लोकांच्या बाबतीत अस वागण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात कुणी बोलला किंवा उभा ठाकला तर केंद्राच्या सर्व एजन्सी त्याचा पाठलाग करतात. त्याला कसं झुकवायच अस सुरू असत. एकीकडे उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक सुरू आहे अशावेळी आम्ही मुस्लिम मंत्र्याला सुद्धा कसं डांबून ठेवतो अस दाखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. राज्य सरकार यावर लक्ष ठेऊन आहे आणि यावर काय निर्णय होतो ते तुम्हाला लवकरच कळेल.

Nitin Raut
कच्चा बदाम गायक भुबन बड्याकरचा अपघात, रुग्णालयात दाखल

आता यावर काय बोलणार...? देशाच्या पंतप्रधानांनी याची दखल घेतली पाहिजे, त्याठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याचं काम केंद्र सरकारच आहे. आम्ही राज्य सरकार म्हणून त्यांना विनंती करतो पण जर केंद्र सरकार त्यांना आणण्याचे वाढीव पैसे घेत असेल तर हा हास्यास्पद प्रकार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com