धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पुन्हा ईडी चौकशी केली जात आहे. चौकशीच्या नावाने (Dhule) त्यांना हेतू पुरस्कर मानसिक त्रास देण्याचे काम केंद्र सरकार व राज्य सरकार करीत असल्याचा आरोप लावत (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने धुळ्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले. (Live Marathi News)
राज्यात व देशामध्ये इतर प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असताना देखील राज्य सरकार व केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत (Dhule NCP) असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांतर्फे लावण्यात आला. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचबरोबर देशात व राज्यात तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित असताना, (Rohit Pawar) केंद्र व राज्य सरकारतर्फे खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांतर्फे लावण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घंटानाद करून राज्य सरकार व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर राज्य सरकारच्या या ईडी धोरणाविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.