अभिजित देशमुख
कल्याण : रेल्वेमधील होत असलेले क्राईम काही केल्या थांबत नाही. अशात एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या घाईत असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरी केले जात होते. या मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला (Kalyan) कल्याण रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. विशाल काकडे असे या चोरट्याचे नाव आहे. (Latest Marathi News)
नाशिक (Nashik) येथील निफाड नजीकच्या गावात राहणारे रफिक तांबोळी हे कामानिमित्त कल्याणला आले होते. ते घरी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला आले होते. कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan Railway Station) मेल एक्सप्रेस पकडण्याच्या गडबडीत असताना त्याचा पाठलाग करणाऱ्या चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी रफिक यांनी आरडाओरडा केला. आरडाओरड ऐकून स्टेशनवर गस्तीवर असणाऱ्या रेल्वे पोलिसांकडे (Railway Police) त्याच्याकडे लक्ष गेले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रेल्वे पाेलिसांनी पाठलाग करत चोरट्याला अटक केली. चोरट्याचे नाव विशाल महेंद्र काकडे असे आहे. विशाल हा सराई चोरटा असून त्याच्या विरोधात याआधी देखील चार ते पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.