Road Bhoomi Pujan kalyan
Road Bhoomi Pujan kalyan Saam Tv

Kalyan News: कल्याणमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पालक भिडले, रस्त्याच्या भूमीपूजनादरम्यान जोरदार राडा

Road Bhoomi Pujan : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमीपूजन होणार होणार होते. भाजप आमदार गायकवाड भूमीपूजनाच्या ठिकाणी पोहचले. त्याठिकाणी सेंट ज्यूड्स शाळेचे पालक, विद्यार्थी, स्थानिक नागरीक जमा झाले. सेंट ज्यूड्स शाळेचे पालक आणि काही नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत गोंधळ घातला.
Published on

(अभिजीत देशमूख)

Kalyan News Road Bhoomi Pujan :

कल्याण पूर्वेत रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान जोरदार राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते, स्थानिक नागरीक आणि शाळेच्या कर्मचारी पालकांमध्ये राडा झाल्याने तणावाची परिस्तिथी निर्माण झाली होती. कल्याण पूर्वेत नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर जरीमरी परिसर आहे. या परिसरात असलेल्या एका रस्त्याचा भूमीपूजन कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता.(Latest News)

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमीपूजन होणार होणार होते. भाजप आमदार गायकवाड भूमीपूजनाच्या ठिकाणी पोहचले. त्याठिकाणी सेंट ज्यूड्स शाळेचे पालक, विद्यार्थी, स्थानिक नागरीक जमा झाले. सेंट ज्यूड्स शाळेचे पालक आणि काही नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत गोंधळ घातला. या दरम्यान जोरदार राडा झाला. यामध्ये महिला लहान मुले वयोवध्द्ध या राड्यात सामील झाले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता व्हावा, अशी मागणी केली जात आहे. मंजूर झालेल्या रस्त्याच्या शेजारी सेंड ज्यूड्स ही चर्चची शाळा आहे, हा भूखंड चर्चाचा आहे, त्यामुळे चर्चच्या लोकांनी रस्त्याला विरोध केलाय. या रस्त्यासाठी शासकीय निधी मंजूर झाला, असल्याची माहिती भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिलीय. परंतु या रस्त्याला शाळेचे पालक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केलाय. भूमिपूजन करण्यासाठी भाजप आमदार आल्यानंतर नागरिकांनी आमदारांसमोर गोंधळ घातला.

ही चर्चची खासगी जागा आहे. या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम होऊ शकत नाही. विरोध करणाऱ्या नागरिकांनी काम सुरू करताना आम्हाला विश्वास घेतले नाही, आम्ही चर्चा करण्यासाठी आलो, तेव्हा आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. जरीमरी नगर परिसरातील नागरिक आणि शाळेचे पालक यामध्ये जोरदार राडा झाला. चर्चची जागा असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, ही जागा चर्चची आहे. रस्तादेखील चर्चा आहे. दादागिरी करुन आमच्या जागेवर काम केले जात आहे. आमच्या लोकांना मारहाण झालीय.

आमदारांच्या कार्यकर्त्यांनी महिला लहान मुलांना मारहाण केली. भाजप आमदार गायकवाड यांचे म्हणणे आहे की, हा आरक्षित भूखंड आहे. सरकारने रस्त्यासाठी निधी दिलाय. कोणी रस्ता बंद करुन शकत नाही. आम्ही भूमीपूजन केले आहे. रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचं म्हटलंय.

Road Bhoomi Pujan kalyan
Kalyan Railway Yard : खेळता खेळता चढला मालगाडीवर; रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याने १३ वर्षीय मुलगा गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com