Dhule NCP
Dhule NCP Saam tv
महाराष्ट्र

Dhule: राष्ट्रीय कौंटुंबिक आरोग्य अहवाल विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यातील महिला या राज्यात सर्वांत जास्त दारु पितात व त्या मद्यपी आहेत; असा अहवाल राष्ट्रीय कौंटूबिक आरोग्य यंत्रणेने नुकताच दिला आहे. याचा (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करीत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत संताप व्यक्त करण्यात आला आहे. (Dhule NCP News)

राष्ट्रीय कौंटूबिक आरोग्य यंत्रणेच्‍या अहवालामुळे (Dhule) धुळे जिल्ह्यातील सर्वच महिलांचा अपमान झाला. असे म्हणत राज्यामध्ये धुळ्यातील (Dhule NCP) महिला या चेष्ठेचा विषय झाला असून हा अहवाल म्हणजे धुळे जिल्ह्याचा अपमान आहे; असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्या महिला व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच सदर अहवाल कोणत्या माहितीच्या आधारे तयार केला. याचा खुलासा राज्य सरकारने केला पाहिजे.

अहवाल मागे घ्या

धुळे जिल्ह्याची आकडेवारी कुठून आणली, कोणी दिली, कोणते निकष लावून सर्व्र्हे केला? ही देखील माहिती जनतेसमारे येणे गरजेचे असल्याचे म्हणत शिंदे - फडणवीस सरकारने जिल्ह्यातील महिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असून सदर अहवाल त्वरीत मागे घ्यावा; अशी मागणी राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

SCROLL FOR NEXT