Jalgaon: अंगावर पेट्रोल टाकून तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; शासनाकडून थकले साडेपंधरा लाख

अंगावर पेट्रोल टाकून तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; शासनाकडून थकले साडेपंधरा लाख
Jalgaon News jalgaon Collector
Jalgaon News jalgaon CollectorSaam tv

जळगाव : चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात कोरोना काळात भाडेतत्त्वावर लावलेल्या रुग्णवाहिका (Ambulance) लावली होती. परंतु याची थकीत रक्कम शासनाकडून अद्याप मिळालेली नाही. यामुळे चाळीसगाव (Chalisgaon) येथील तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Jalgaon Collector Office News)

Jalgaon News jalgaon Collector
Jalna: ‘एनआयए’च्या कारवाई विरोधात पॉपुलर फ्रंटची निदर्शने; ताब्यात घेतलेल्यांना सोडण्याची मागणी

चाळीसगाव येथील धीरज अशोक कोसोदे असे तरुणाचे नाव आहे. धीरज याच्याकडे खासगी रूग्णवाहिका आहे. त्यावरच तो उदरनिर्वाह करतो. कोरोना (Corona) काळात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने धीरज कासोदे याच्या तीन रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर लावल्या होत्या. या दरम्‍यान आपली सेवा बजावली होती. या कालावधीत (Jalgaon) तीनही रुग्णवाहिकेचे एकूण १५ लाख ५१ हजार ४०० रुपये शासनाकडे थकीत आहेत. थकीत असलेली रक्कम मिळावी यासाठी धीरजने वारंवार मागणी केली. परंतु, धीरज याच्‍या मागणीची चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयाने कुठलीही दखल घेतली नाही.

अखेर पोहचला जिल्‍हाधिकारी कार्यालयात

कर्ज काढून रुग्णवाहिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. तरुणाने केलेल्या मागणीची कुठलीही दखल न घेतल्याने अखेर आज (२३ सप्टेंबर) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीसांच्या सतर्कतेमुळे तातडीने धाव घेत तरुणांच्या हातातील पेट्रोलची बाटली व आगपेटी जप्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com