Police fir
Police fir 
महाराष्ट्र

धुळ्यातील दगडफेक..पन्‍नास कार्यकर्त्यांवर गुन्‍हा दाखल

भूषण अहिरे

धुळे : केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर धुळ्यात भाजप- शिवसेनेचे आमने– सामने आले होते. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या प्रकरणात धुळे शहर पोलिस ठाण्यात तब्बल पन्नास कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule-news-narayan-rane-matter-bjp-shiv-sena-Fifteen-activists-have-been-charged)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काल राज्यामध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने येत एकमेकांना भिडल्याचे बघावयास मिळाले. धुळ्यात देखील अशीच काहीशी परिस्थिती झाली होती. धुळ्यात देखील नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने राणे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली होती. या प्रेत यात्रेची कुठल्याही प्रकारची परवानगी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली नसल्याचे धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

दोन्‍ही पक्षाच्‍या कार्यकर्त्यांवर गुन्‍हा

दरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर केलेल्या दगडफेकीनंतर धुळे शहर पोलीस ठाणेमध्ये तब्बल ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवसेनेचे २९ कार्यकर्ते तर भाजपचे २१ कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सध्या शहर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उध्दव ठाकरेंची सभा

Chhagan Bhujbal : कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करा, भुजबळांचं PM मोदींना पत्र

Ramdas Athawale: संविधान धोक्यात नाहीतर त्यांचे पक्ष धोक्यात; रामदास आठवलेंची 'इंडिया' आघाडीवर टीका

Effects of Garlic in Summer: उन्हाळ्यात लसून खाल्यास होतील 'हे' गंभीर आजार

Effects of Green Tea : डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT