MSRTC Bus
MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari: विठ्ठल दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी अनोखा उपक्रम; एसटीचे ९० सरपंचाना पत्र

भूषण अहिरे

धुळे : धुळे परिवहन विभागातर्फे पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अनोख्या पद्धतीने सेवा पुरवली जात आहे. पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी थेट आपल्या गावातूनच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरपर्यंत (Pandharpur) बस सेवा पुरवली जात आहे. (dhule news msrtc Unique activities for devotees going to pandharpur)

विठुरायाच्या दर्शनासाठी गावागावातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना (St Bus) एसटी प्रशासनातर्फे उत्तम असा उपक्रम राबवत दिलासा दिला आहे. थेट आपल्या गावातून पंढरपूरपर्यंत एसटी (Dhule News) प्रशासनातर्फे पंढरपूरकडे जाणाऱ्या (Ashadhi Wari) भाविकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत.

सरपंचाना पत्र

जवळपास 85 ते 90 गावांच्या सरपंचांना या संदर्भातील पत्र देण्यात आले असून (Dhule) धुळे एसटी प्रशासनातर्फे राबविल्या जात असलेल्या या अनोख्या उपक्रमाला धुळे जिल्ह्यातील खेडापाड्यातील भाविक ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमामुळे जवळपास चार ते पाच महिने आंदोलनादरम्यान डबघाईला आलेल्या लालपरीला सुरळीत करण्यासाठी चांगलीच चालना मिळणार आहे.

आतापर्यंत सोडल्‍या ७० बस

धुळे आगारातून जवळपास या संदर्भात 70 बसेसची व्यवस्था एसटी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. भाविकांतर्फे मागणी वाढल्यास आणखी बसेस वाढवण्याचा निर्णय देखील एसटी प्रशासनातर्फे घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना थेट आपल्या गावातूनच पंढरपूरपर्यंत लाल परीतुन सुखद प्रवास करता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT