महसूल मंत्री पद मिळू शकते; पण श्रेष्ठी निर्णय घेणार ते मान्यः गुलाबराव पाटील

महसूल मंत्री पद मिळू शकते; पण श्रेष्ठी निर्णय घेणार ते मान्यः गुलाबराव पाटील
Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam tv

जळगाव : राज्‍यात सत्‍ता बदल झाल्‍यानंतर जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना महसूल मंत्री पद मिळावे; असे कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र या संदर्भात गुलाबरावांना (Gulabrao Patil) विचारले असता त्यांनी यास दुजोरा दिला आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मान्य असेल असेही यावेळेस त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. (jalgaon news Can get the post of revenue minister But the decision will be taken Gulabrao Patil)

Gulabrao Patil
गावाबाहेर येत ग्रामस्‍थांनी केले सामूहिक जेवण; पावसासाठी निसर्ग देवतांची पूजा

पंधरा दिवसांपासून सुरू असलेले राजकारणाचे नाट्य संपले. यानंतर राज्‍यात (BJP) भाजप व शिंदे गटाने सत्‍ता स्‍थापन केली. यानंतर गुलाबराव पाटील हे आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आले. यावेळेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गुलाबरावांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी घोषणा देत पाठिंबा दर्शवला.

शिंदे साहेबाना परत आणा म्‍हणून सांगितले, पण..

गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की बरेचसे आमदारांचे काम होत नव्‍हते. याबाबत मी वैयक्तिक उद्धव ठाकरे यांना भेटून सांगितले होते. तसेच शिंदे साहेबांसोबत जे आमदार आहेत त्‍यांच्‍यासह शिंदे साहेबांना परत आणा; असेही सांगितले होते. मात्र माझे कोणी ऐकले नाही. जळगाव जिल्ह्यातील चारही आमदार फुटल्यानंतर मी शेवटी बाहेर पडलो. एकाच वेळेस चाळीस आमदार बाहेर पडतात ही मोठी फूट आहे. आमचे कोणी ऐकून घेत नव्हते. शिंदे साहेब समजून घेत होते. काही कार्यकर्ते नाराज आहे त्यांचे नाराजी आणि दूर करणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com