Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: अंगणात उभ्‍या महिलेचा मोबाईल लांबविला; दोघे चोरटे ताब्‍यात

अंगणात उभ्‍या महिलेचा मोबाईल लांबविला; दोघे चोरटे ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील कोळवले नगरात धुमस्टाईलने महिलेचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना दहा दिवसांपुर्वी घडली होती. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी (Police) तपासाला वेग दिला असता दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात शोध पथकाला यश आले आहे. (Maharashtra News)

धुळे (Dhule) शहरातील कोळवले नगरात राहणाऱ्या सुनिता प्रशांत सोनार ही महिला आपल्या घरासमोरील रोडवर उभी होती. या दरम्‍यान दोन अज्ञात तरुणांनी मोटारसायकलवर येवून महिलेच्या हातातील मोबाईल जबरीने चोरुन नेला होता. यासंदर्भात महिलेने शहर पोलीस (Dhule Police) ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

५० हजाराचा मुद्देमाल जप्‍त

सदर मोबाईल चैतन्य जगदीश पाटील व आकाश रवींद्र वाघ या दोघांनीच चोरल्याचे निष्पन्न झाले. शोध पथकाला रवाना करुन दोघांना अटक करण्यात आली. पथकाने या दोघांकडून महिलेचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघे चोरटे चितोडचे राहणारे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

SCROLL FOR NEXT