Accident News: बसच्‍या चाकाखाली आल्‍याने विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी

बसच्‍या चाकाखाली आल्‍याने विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

अमर घटारे

अमरावती : अमरावतीत सिटी बसने चिरडुन विद्यार्थींनीचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरावती (Amaravati) शहरातील अशासकीय भियंता महाविद्यालय समोरील घटना (Accident News) असून नेहा इंगोले (वय २१) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. (Tajya Batmya)

Accident News
Crime News: इंस्टाग्रामवर ओळख, भेटायचे ठरले; अन्‌ तो नवीन दुचाकी घेऊन पसार

नेहा इंगोले ही आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर जात असताना विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालया समोर दुचाकीला ब्रेक लावला. यानंतर रस्त्यावर दोघेही पडले. यावेळी मागून येणाऱ्या सिटी बसचे मागील चाक नेहाच्या डोक्यावरून गेल्याने तिचा मृत्यू (Accident Death) झाला. नंतर नेहाला खाजगी रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले.

तरूण उपचारासाठी दाखल

सध्‍या नेहाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला आहे. तर त्या तरुणाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com