Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मुलगी झाल्‍याचा आनंद इतका की संपूर्ण गावासाठी घेतला अनोखा निर्णय; गावकरीही झाले आनंदी

कन्‍यारत्‍न झाल्‍याचा आनंद इतका की संपूर्ण गावाच्‍या कराची २० टक्‍के रक्‍कम भरणार

भूषण अहिरे

धुळे : मुलीच्या जन्मानंतर नाकतोंड पिळणाऱ्यांना धुळ्यातील पाटील दांपत्याने कन्यारत्नाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत आदर्श (Dhule News) निर्माण करून दिला आहे. कन्यारत्न प्राप्तीच्या आनंदात पाटील दांपत्यातर्फे चक्क गावातील घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या संपूर्ण गावातील ग्रामस्थांचे २० टक्‍के रक्कम भरण्याचा निर्णय घेत तशी घोषणाच केली आहे. या अनोख्या पद्धतीने कन्यारत्न जन्माचे स्वागत केल्याने संपूर्ण जिल्हाभरातून (Sarpanch) सरपंच नंदिनी पाटील दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. (Live Marathi News)

एकीकडे मुलगी जन्माला आल्यानंतर कुटुंबीयांमध्ये काहीशी नाराजी बघास मिळत असते. परंतु धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दबाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदिनी पाटील यांना दुसऱ्यांदा देखील कन्यारत्न जन्माला आले. यानंतर तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले आहे. नुसते स्वागताच नाही, तर या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर देखील तिच्या जन्माचा आनंद संपूर्ण गावासोबत या दांपत्यातर्फे साजरा करण्यात येत आहे.

पहिल्‍या मुलीप्रमाणेच जन्‍मोत्‍सव साजरा

पाटील दांपत्यास यापूर्वी देखील चार वर्षांची मुलगी आहे. दुसरे दांपत्य देखील मुलगीच जन्माला आल्यानंतर मुलाच्या जन्माप्रमाणेच या दांपत्याने मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा केला आहे. या मुलीच्या जन्मोत्सवात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे गावात कीर्तन व भोजनाचा कार्यक्रम ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची यापूर्वीच तारीख व्यस्त असल्यामुळे कीर्तनाचा कार्यक्रम करणे शक्य होत नसल्यामुळे कन्यारत्नाला जन्म देणाऱ्या महिला सरपंच पाटील दांपत्याने चक्क मुलीच्या जन्माच्या निमित्ताने गावातील पाणीपट्टी व घरपट्टी भरणाऱ्या करधारकांचा २० टक्‍के कर भरण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT