Nashik News: नाशिक जिल्ह्यात तिसऱ्यांदा अवकाळीचा फटका; द्राक्षांसह पिकांचे मोठे नुकसान

नाशिक जिल्ह्यात तिसऱ्यांदा अवकाळीचा फटका; द्राक्षांसह पिकांचे मोठे नुकसान
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. या पावसामुळे (Rain) द्राक्षासह कांदा, गहू, मका, टोमॅटो, ज्वारी आणि भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील (Nashik News) नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सुरगाणा, मनमाड, बागलाण या तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास असा हिरावला जात असताना शेतकरी (Farmer) हवालदील झालाय. (Breaking Marathi News)

Nashik News
Child Marriage: अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक जिल्ह्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. अगोदरच्या नुकसानाची पंचनामे होतात न होतात तोच आता पुन्हा एकदा गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतातील पीक पूर्णतः उध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा औषधाचा खर्च, शेतमाल पिकवण्यासाठी येणारा खर्च हा येणाऱ्या उत्पादनातून निघत असतो. परंतु अवकाळी पावसाने संपुर्ण पिकाची नासधूस झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज औषध पाण्याचा खर्च निघणार कसा? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे.

Nashik News
Corona Update News: कोरोना रुग्ण वाढताय; राज्य आरोग्य विभागाने तयारी सुरू

शेतात गारांचा खच

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील बेळगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव, मोर धामणगाव, साकूर, टाकेद परिसरात अवकाळी पावसाबरोबरच जोरदार गारपीट झाली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही झाला. अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडला असून यामुळे बळीराजा पूर्णतः हैराण झालाय. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये; यासाठी सरकारला सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Nashik News
Nandurbar Crime News: वैयक्तिक वादातून दिवसाढवळ्या तरुणाचा खून

कृषी आयुक्‍तांकडून पाहणी

दरम्यान आज राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण हे देखील नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाचा पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ते आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, वणी आणि सटाणा परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. लवकरच पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत दिली जाईल; अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com