dhule corpotaion 
महाराष्ट्र

धुळे महापालिकेत भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’

धुळे महापालिकेत भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’

साम टिव्ही ब्युरो

धुळे : घनकचरा संकलनाच्या कामासाठी नियुक्त बचतगटाला बिल मिळाल्यानंतर टक्केवारी काढून महापालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आरोग्याधिकाऱ्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यात येत होते. धुळे महापालिकेत (Dhule corporation) हा भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ असल्याचा गंभीर आरोप करत याबाबत संबंधितांचे बँक डिटेल्स मागवा, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नागसेन बोरसे यांनी स्थायी समिती सभेत केली. सभापती संजय जाधव यांनीही याबाबत सविस्तर माहिती पुढच्या सभेत ठेवा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (dhule-news-Jalgaon-pattern-of-corruption-in-Dhule-Municipal-Corporation)

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रेक लागलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. ९) महापालिका सभागृहात झाली. सभापती जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. या सभेत प्रभाग क्रमांक १५ मधील सार्वजनिक शौचालये विविध संस्थांना देखभाल-दुरुस्तीसाठी दिली होती. मात्र, संबंधित संस्थांबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने संबंधित नियुक्त संस्थांकडून शौचालये देखभाल-दुरुस्तीचे काम काढून मे. जमुना बहुद्देशीय संस्थेला देण्याबाबतचा विषय सभेपुढे होता. या विषयाच्या अनुषंगाने सदस्य श्री. बोरसे यांनी या जमुना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किंवा प्रमुख कोण, असा प्रश्‍न प्रशासनाला केला. त्यावर सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांनी पवन रत्नाकर बाविस्कर असे नाव सांगितले. हाच धागा पकडून श्री. बोरसे यांनी पवन बाविस्कर अर्थात पवन माळी असे त्यांचे नाव असल्याचे म्हणत पवन बाविस्कर (माळी) यांचे वडील महापालिकेत सहाय्यक आरोग्याधिकारी होते, असे सांगितले.

बँक डिटेल्स मागवा

श्री. बोरसे म्हणाले, की यापूर्वी महापालिकेत बचतगटांच्या माध्यमातून घनकचरा संकलनाचे काम केले जात होते. यात आदित्य महिला बचतगटही होता. या बचतगटाला कामाचे बिल मिळाल्यानंतर टक्केवारी काढून पैसे पवन माळी यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले जात होते. भ्रष्टाचाराचा हा जळगाव पॅटर्न धुळे महापालिकेत घडल्याचे श्री. बोरसे म्हणाले. या भ्रष्टाचारासाठी पदाचा दुरुपयोग केला गेला, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात आपण बँकेकडे माहिती मागितली, मात्र बँकेने अशी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने बँकेकडून याबाबत सविस्तर मागवावी, अशी मागणी श्री. बोरसे यांनी केली. या बँक डिटेल्समधून सर्वकाही समोर येईल, असा त्यांचा रोख होता. दरम्यान, शौचालय देखभाल-दुरुस्तीचे काम मे. जमुना बहुउद्देशीय संस्थेला देण्याचा विषय मंजूर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT