Dhule Crime
Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

चोरीच्‍या घटनांचा लागला छडा; सराईत चोरटा ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या चोरीचा छडा लावला असून नंदुरबार (Nandurbar) येथील धडगाव येथे राहणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. (dhule news Incidents of theft police arrested in person)

दोंडाईचा (Dondaicha) शहरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या अनुषंगाने दोंडाईचा पोलिसांसह (Police) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता एका सराईताचे नाव या तपासादरम्यान उघडकीस आले. नंदुरबार येथील या (Dhule News) सरायीतास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची पुढील विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

मोबाईल हस्‍तगत

चोरट्यांकडून पोलिसांनी दुचाकी वाहन त्याचबरोबर चोरी केलेला मोबाईल हस्तगत केला आहे. या चोरट्याच्या विरोधामध्ये यापूर्वीच शहादा पोलीस ठाणेमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून या चोरट्याने कुठे कुठे आणि कशा प्रकारे चोरी केली आहे याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच दोंडाईचा पोलिस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अजिंठा घाटात बस पलटी, सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

Priyanka Gandhi: राहुल गांधी पुन्हा 2 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात, प्रियंका गांधींसाठी काँग्रेसचा प्लॅन काय? बड्या नेत्याने दिली माहिती

Amruta Kulkarni: अमृताचे गाजलेले चित्रपट माहितीये आहेत का?

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

SCROLL FOR NEXT