Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : अवैधपणे गॅस सिलेंडरची साठवणूक; धुळे पोलिसांनी छापा टाकत कारवाई, १६ सिलेंडर केले जप्त

Dhule News : धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील हटकरवाडी येथे तक्रारदाराने धुळे शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना माहिती देऊन सदर ठिकाणी अवैधपणे गॅसचा साठा करून ठेवला असल्याची माहिती दिली

भूषण अहिरे

धुळे : अवैध गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून धुळे शहर पोलिसांनी छापा टाकून जवळपास १६ अवैधपणे गॅस सिलेंडर जप्त केले. तसेच संबंधितांविरोधामध्ये धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दहा भरलेले गॅस सिलेंडर व सहा रिकामे गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत,

धुळे (Dhule) शहरातील चितोड रोड परिसरातील हटकरवाडी येथे तक्रारदाराने धुळे शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना माहिती देऊन सदर ठिकाणी अवैधपणे गॅसचा साठा करून ठेवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर धुळे शहर पोलिसांनी (Dhule Police) तात्काळ पथक सदर ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी छापामारी केली. याठिकाणी जवळपास १६ अवैधपणे गॅस सिलेंडर साठवून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातील दहा गॅस सिलेंडर हे भरलेले असून सहा गॅस सिलेंडर हे रिकामे असल्याचे निदर्शनास आले.  

पोलिसात गुन्हा दाखल 

संबंधितांना या १६ गॅस सिलेंडर संदर्भात परवाना विचारला असता कुठल्याही प्रकारचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर धुळे शहर पोलिसांनी यासंदर्भात संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

८ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना मिळणार लाभ, धनलाभही होणार

दादांना घेरण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? भाजपच्या 'मिशन 100' ला 'दादां'चे आव्हान

Maharashtra Live News Update: हार्बर रेल्वे उशिराने; प्रवाशांचा अर्धा ते पाऊण तास खोळंबा

Ambarnath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, काँग्रेसच्या त्या १२ नगरसेवकांचा मोठा निर्णय

मुस्लीम चिडला, जलीलांवर हल्ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमका राडा कशामुळे झाला?

SCROLL FOR NEXT