धुळे : साक्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर बऱ्याच ठिकाणी पूल वाहून गेल्याच्या घटना उघडकिस आल्या आहेत. त्यामध्ये पिंपळनेर येथील बल्हाने-पारगाव रस्त्यावरील फरशी पूल वाहून (Dhule News) गेला आहे. तर दुसरीकडे गुटकळ नदीवरील असलेला पूल देखील वाहून गेल्याने चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे. घरांची देखील पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. (Dhule news Heavy rains washed away the bridge)
धुळे (Dhule) जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. यानंतर पावसाने उसंत घेतल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र या मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. यात पूल वाहून गेल्याच्या घटना उघडकीस आल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे बऱ्याच ठिकाणी काम झाल्यामुळे पहिल्याच पावसात फुलांची व रस्त्यांची अवस्था खराब झाल्याचा आरोप देखील परिसरातील नागरिकांतर्फे लावण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.