Dhule Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Dhule Bajar Samiti : हमाल मापाडी कामगारांनी पुकारला बंद; धुळे बाजार समितीचे व्यवहार ठप्प

Dhule News : बाजार समितीतील हमालीत वाढ करण्याची मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे करण्यात आली होती. संघटनाकडून मागणी करुन देखील याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. यामुळे हमाल मापाडीनी आक्रमक भूमिका घेतली

भूषण अहिरे

धुळे : धुळ्याच्या बाजार समितीमधुले हमाल मापाडी कामगारांना मजुरी वाढ मिळावी; या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हमाल मापाडी कामगार संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सकाळपासून सर्व कामगार संपावर गेले आहेत. संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट जाणवत आहे. तसेच बाजार समितीमधील व्यवहार देखील सकाळपासून ठप्प पडले आहेत. 

धुळे बाजार समितीतील हमाल मापाडी संघटनांनी शेतकऱ्यांकडील हमाली व तोलाईत मजुरी वाढवून मिळण्यासाठी आजपासून बाजार समितीमधील कामकाज बेमुदत बंद ठेवले आहे. बाजार समितीतील हमालीत वाढ करण्याची मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे करण्यात आलेली होती. मात्र संघटनाकडून मागणी करुन देखील याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. यामुळे हमाल मापाडीनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

बंदचा यापूर्वीच दिला होता इशारा 

दरम्यान हमाली व तोलाई मजुरीत वाढ करण्याची मागणी प्रशसनाकडे प्रलंबित आहे. यामुळे त्यावर त्वरीत निर्णय घेण्यात यावा, अन्यथा बेमुदत बंद आंदोलन पुकारण्यात येईल; असा इशारा यापुर्वीच देण्यात आला होता. तरी देखील प्रशासनाने या मागणीकडे लक्ष न दिल्याने अखेर आजपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे. कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल आहे.

बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद 

हमाल मापाडी कामगारांनी काम बंद करण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळपासून बाजार समितीत काम बंद सुरु करण्यात आले आहे. यामुळे शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी बाजार समितीतील आज दिवसभरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच हमाल मापाडी कामगारांच्या मागणीवर काही तोडगा निघत नाही; तोपर्यंत काम बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT