Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

कारसह सागवानी लाकूड जप्त

साम टिव्ही ब्युरो

पिंपळनेर (धुळे) : येथील वन विभागाच्या पथकाने उमरपाटा ते मोहुबन खोपसा गावाजवळ (ता. साक्री) सापळा रचत सागवान लाकडाची तस्करी रोखली. अंधाराचा फायदा घेत गाडी सोडून संशयित फरारी झाले. वाहनासह एक लाख ५६ हजारांचा पाचशे रुपये किंमतीचा सागाचा मुद्देमाल जप्त केला. (dhule news forest department Teak wood seized with car)

पिंपळनेर येथील वनाधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शासकीय वाहनाने प्रोसेसिंग करताना सोमवारी (ता.११) रात्री साडेसात ते साडेदहा वाजेच्या दरम्यान पिंपळनेर वन विभागाचे (Forest Department) वनाधिकारी अरुण माळके, वनपाल एम. एन. बच्छाव, वनरक्षक भूषण वाघ, ए. पी. पवार, योगेश पवार, गुलाब बहिरम, देविदास देसाई, सागर सूर्यवंशी, के. एस. पवार, नाना विभांडीक, दिनेश घुगे, आदी उमरपाटा ते मोहुबन खोपसा गावाजवळ (ता. साक्री) रस्त्यावर प्राप्त गुप्त माहितीवरून पथकाने सापळा रचला.

दीड लाखाच मुद्देमाल जप्‍त

यावेळी इंडिगो कंपनीची जुने वाहन (एमएच १२ बीडब्ल्यू ४५४५) वरून सागाच्या चौकट घेऊन तस्कर येताना दिसले. पथकाने (Dhule News) त्यांना आवाज देऊन रस्त्यावर अटकाव करत असताना वाहन चालक वाहन व सागवानी लाकूड सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. वन विभागाने सागवानी चौकटीचे १.२९१ घनमीटर सागवानी नग व इंडिगो वाहन जप्त केली. सागवानी चौकट अंदाजे किंमत सहा हजार पाचशे रुपये व एक जुने चारचाकी अंदाजे किंमत एक लाख पन्नास हजार रुपये, असा एकूण एक लाख छप्पन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करत पिंपळनेर वन विभागाने जप्त करून पिंपळनेर डेपोत जमा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert: मुंबई, पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Vrishabh Rashi Personality : वृषभ राशीचे लोक सर्वांनाच हवेहवेसे का वाटतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

Rashi Bhavishya : पैशांची आवक वाढेल, पुढे जाण्याचे मार्ग मिळतील; तुमच्या नशीबात आज काय लिहलंय? जाणून घ्या

Horoscope 12 May 2024 : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? जाणून घ्या

VIDEO: KKRची दमदार कामगिरी; गंभीरच्या मार्गदर्शनाचं कौतुक करताना ढसाढसा रडला चाहता

SCROLL FOR NEXT