Siddhi Hande
होळीला महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पुरणपोळी बनवली जाते. पुरणपोळी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
खानदेशात खापरावरची पुरणपोळी बनवली जाते. ही पुरणपोळी खूप मोठी असते. याला मांडे असेदेखील म्हणतात.
खापर हे मातीचे असते. म्हणजे मडक्याचे झाकण किंवा कढई उलटी केली जाते. त्यावर हे मांडे भाजले जातात.
ही पोळी पातळ असते. ती खापरावर भाजल्याने त्याला खमंग आणि धुरकट चव लागते.
सर्वात आधी तुम्हाला चणाडाळा शिजवून घ्यायची आहे. ही डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.
यानंतर डाळीत गूळ टाकून मॅश करा. त्यात वेलची, जायफळ पूड टाका. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हळवून घ्या.
यानंतर हे पुरण यंत्र किंवा चाळणीतून पुरण वाटून घ्या.
यानंतर गव्हाचे पीठ आणि मैदा एकत्र मळून घ्या. त्यात थोडे तूप टाका.पीठ १ तास झाकून ठेवा.
यानंतर पीठाचा गोळा घ्या. त्यात पुरण भरा. यानंतर हलक्या हाताने लाटून घ्या.
पोळी थोडी लाटल्यानंतर ती हाताने गोल-गोल फिरवा. हाताच्या कोपऱ्या्या साहाय्याने पोळी लांबवून घ्या.
यानंतर खापर उलटे ठेवून त्यावर ही पोळी भाजून घ्या. ही खमंग पुरणपोळी खूप चविष्ट लागते.