Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Police : कारमधून विदेशी दारूची तस्करी; धुळे पोलिसांची कारवाई, दोघांना मुद्देमालासह अटक

Dhule News : राज्यात दारू विक्री व वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असताना देखील मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून छुप्या पद्धतीने विदेशी तसेच बनावट दारुची तस्करी केली जात असते

भूषण अहिरे

धुळे : दारू विक्री व वाहतुकीस बंदी असताना देखील विदेशी दारू तस्करी केली जात असल्याचे धुळ्यात पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचत कारवाई केली आहे. या कारवाईत विदेशी दारूच्या मुद्देमालासह पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

राज्यात दारू विक्री व वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असताना देखील मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून छुप्या पद्धतीने विदेशी तसेच बनावट दारुची तस्करी केली जात असते. पोलिसांनी अनेकदा कारवाई करत दारूचा साठा जप्त केला आहे. तरी देखील छुप्या पद्धतीने दारूची तस्करी करण्यात येत असल्याचे धुळ्यात झालेल्या कारवाईवरून समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. 

सापळा रचत पकडली कार 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेगाव- धुळे महामार्गावर लक्झील होम डेकॉर शॉपजवळ सापळा रचला. यावेळी पोलिसांना संशयास्पद कार दिसताच त्यांनी तिचा पाठलाग करून थांबवले. कारची झडती घेतली असता मागील सीटवर आणि डिक्कीत असलेल्या मोठ्या बॉक्ससारख्या कप्प्यात विविध कंपन्यांची विदेशी दारू आणि बिअर सापडली आहे. 

१ लाख ३३ हजाराची दारू जप्त 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारमधून १ लाख ३३ हजार ३२५ रुपये किमतीची विदेशी दारू आणि बिअर तसेच ५ लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. तर विदेशी दारू आणि बिअरची तस्करी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Marathi Wishes: सोन्यासारख्या शुभेच्छा! धनत्रयोदशीनिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास मेसेजेस

EPFO New Rule: EPFO च्या नियमात मोठा बदल! पेन्शनधारकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

Ambernath : एका चुकीमुळे तरुणाला जीव गमवावा लागला, ते इंजेक्शन घेतलं असतं तर...

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Railway Mega Block : 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT