चिमठाणे (धुळे) : खलाणे (ता. शिंदखेडा) येथील गाव शिवारात असलेल्या शेतातील बांधावर बसविलेला वीजपंप सुरू करण्यासाठी तरुण गेला होता. पंप सुरु करत असताना पाय घसरल्याने तो बंधाऱ्यात पडला. येथून निघता न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धुळ्याच्या शिंदखेडा (Shindkheda News) तालुक्यातील खलाणे येथील सुनील आसाराम वाघ- पाटील (वय ४९) असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. रविवारी सकाळी आठच्या सुमारास शेताच्या बांधावर बसविलेला वीजपंप सुरू करण्यासाठी सुनील वाघ गेले होते. पंप सुरु करीत असताना त्याचा पाय घसरल्याने बंधाऱ्याच्या पाण्यात पडला. पाण्यातून निघता न आल्याने तो पाण्यात बुडाला.
दरम्यान सदर घटनेची माहिती शेतात काम करणारे मुकेश वाघ, मनोहर पाटील आदींनी त्याला पाण्यातून बाहेर काढून खासगी वाहनाने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांनी तपासणी करून त्यास (Death) मृत घोषित केले. संभाजी वाघ (वय ६०, रा. खलाणे) यांनी दिलेल्या माहितीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक साबीर शेख तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.