Devendra Fadanavis 
महाराष्ट्र

मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय..या कवितेतून कृषिकन्येने घेतला समाचार; वाचा कविता

मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय..या कवितेतून कृषिकन्येने घेतला समाचार; वाचा कविता

भूषण अहिरे

धुळे : मी पुन्‍हा येईन..फडणवीसांचे हे वक्‍तव्‍य चांगलेच गाजले होते. यानंतर पुन्‍हा त्‍यांनी काही दिवसांपुर्वी मला अजूनही मुख्‍यमंत्री असल्‍यासारख वाटतंय हे वक्‍तव्‍य केले आहे. फडणवीसांच्‍या या वक्‍तव्‍याचा कृषीकन्‍येने आपल्‍या कवितेतून चांगलाच खरपूस समाचार घेतला. (dhule-news-feel-like-I-am-the-Chief-Minister-devendra-fadanavis-statement-priyanka-joshi-poem)

काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात मला आमदार झाल्यासारखं वाटत या गाण्याने चांगलेच वेड लावले होते. हे गाणे कित्येक दिवस चर्चेचा विषय ठरल होते. परंतु आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखच वाटतंय हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या या वक्तव्याचा कवितेच्या माध्यमातून समाचार घेतला आहे धुळ्यातील कृषिकन्या प्रियंका जोशी हिने.

पंतप्रधान मोदींचाही कवितेतून समाचार

प्रियांकाने २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडत समाचार घेतल्याच्या बदल्यामध्ये शिवसेनेतर्फे प्रचारक प्रमुख म्हणून तिला जबाबदारी सोपविली आहे. आता देखील प्रियंकाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला अद्यापही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय असं वक्तव्य केले होते. याचा समाचार "मला अद्यापही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय" या कवितेच्या माध्यमातून प्रियंकाने कशा पद्धतीने घेतला आहे.

अशी आहे कविता

सत्ये माघ किती घोळक्यात गोंडा ग..

माझ्या काळजात रवला खुर्चीचाच झेंडा ग..

मला भरलं मुख्यमंत्री पदाच वार ग...

मी मुख्यमंत्रिपदाचाच उमेदवार ग..

विरोधी बाकावर बसून काळीज तूटतय..

जेव्हा मी बघतोय उद्धव साहेबांच्या कामाकडं, मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय..

जेव्हा मी बघतो उद्धव साहेबांच्या प्रसिद्धीकडं, मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय..!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: शॉवरनंतर केसांची अशी घ्या काळजी; ओले केस गळणे आणि तुटणे होईल कमी

Maharashtra News Live Update: हिंगोलीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

Maharashtra Police: पोलिस अधिकाऱ्याने खाकी वर्दीत आयुष्य संपवलं, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; पोलिस दलात खळबळ

Online Shopping Charges : ऑनलाइन वस्तू मागवण्याआधी हे वाचा! सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्ज वाढणार

SCROLL FOR NEXT