Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: आमदार फारुख शहा– ठाकरे गट शिवसैनिकांमध्ये जुंपली; विकास कामांच्या श्रेयवादाची लढाई

आमदार फारुख शहा– ठाकरे गट शिवसैनिकांमध्ये जुंपली; विकास कामांच्या श्रेयवादाची लढाई

भूषण अहिरे

धुळे : विकास कामावरून सध्या ठाकरे गट शिवसैनिक व आमदार फारुक शहा यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. खानदेश वासियांचे कुलदैवत असलेल्या धुळे (Dhule News) शहरातील आई एकवीरा देवी मंदिराच्या कामावरून श्रेयवाद सुरू आहे. (Breaking Marathi News)

माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आई एकविरा देवी मंदिराच्या विकास कामासाठी निधी मंजूर केला असल्याचे म्हणत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रविवारी धुळे येथील आई एकविरा देवी मंदिराच्या परिसरात विकास कामाचे उद्घाटन केले होते. परंतु त्याच ठिकाणी आज आमदार फारुक शहा यांनी विकास कामाच्या फलकाचे अनावरण करून हा विकास निधी आपण आणला असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्‍थगिती उठविल्‍याचा दावा

गेल्या सरकारच्या विकास कामांना सद्यस्थितीत असलेल्या शिंदे व फडणवीस सरकारने स्थगिती दिल्यानंतर आई एकवीरा देवी मंदिराच्या विकास कामाला देखील स्थगिती मिळाली होती. आपण पर्यटनमंत्र्यांकडे पाठपुरावा करून ही स्थगिती उठवत तीन कोटी रुपयांचा निधी मंदिराच्या विकास कामासाठी आणला असल्याचे आमदार फारुक शहा यांनी यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना स्पष्ट केले आहे. यामुळे आता या विकास कामाच्या श्रेयवादाच्या लढाईत पुढे आणखी वाद वाढण्याची देखील चिन्ह या निमित्ताने दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna Photos : ये लाल इश्क; अनारकली ड्रेसमध्ये रश्मिकाचं हिऱ्यासारखं लखलखतं सौंदर्य

Weak Relationship: नवरा- बायकोमधील या ६ चुकांमुळे नात्याचा होतो शेवट

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

Dilip Prabhavalkar: 'कलाकार झालो, पण बाबा नव्हते...'; अभिनय करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या वडीलांच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर भावुक

हायवे, रेल्वे, लोकल अन् मेट्रो... नवी मुंबई विमानतळावर कोणत्या मार्गानं कसं जाल? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT