महाराष्ट्र

कर्जमुक्त झालेल्या महिला शेतकऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी पाठविली मदत

भूषण अहिरे

धुळे : राज्यातील बहुतांश ठिकाणी पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेकडो संसार उघड्यावर आले असून या पूरजन्य परिस्थितीमुळे राज्यावर मोठ्या प्रमाणात संकट ओढवले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न कर्जमुक्‍त झालेल्‍या शेतकरी महिलांनी केला आहे. (dhule-news-Debt-ridden-women-farmers-send-aid-to-flood-victims)

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील या शेतकरी महिलांनी आपल्याकडून बनेल तितकी मदत पूरग्रस्तांसाठी करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्ज मुक्त झालेल्या शेतकरी महिलांनी राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानत पुरग्रस्‍तांना मदतीचा हात दिला आहे.

निधी जमविण्याचे काम सुरू

सर्व महिला एकत्र येऊन निधीत जमवत आहेत. यानंती जमविलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी या कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या देखील पाठविल्या आहेत.

स्‍वतःहून पुढाकार

सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतत पुरग्रस्त भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार आहेत. मदतीमध्ये धुळ्यातील साक्री तालुक्यातील शेतकरी महिलांचा देखील हातभार लागावा या संकल्पनेतून या महिलांनी पूरग्रस्तांसाठी ही मदत जमा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT