Cow funeral 
महाराष्ट्र

सर्पदंशाने गायीचा मृत्‍यू; शेतकरी कुटुंबाने अंत्‍ययात्रा काढून केले अंतिमसंस्‍कार

सर्पदंशाने गायीचा मृत्‍यू; शेतकरी कुटुंबाचे अश्रू अनावर, अंत्‍ययात्रा काढून केले अंतिमसंस्‍कार

भूषण अहिरे

धुळे : वाघाडी (ता. धुळे) या गावातील शेतकऱ्याची गाभण गाय सर्पदंशाने मृत्युमुखी पडली. गायीच्‍या मृत्‍यूनंतर शेतकरी कुटुंबाने परिवारातील सदस्‍याप्रमाणे गावातून अंत्‍ययात्रा काढत अंतिमसंस्‍कार केले. (dhule-news-Death-of-cow-snake-bite-farmer's-family-conducted-the-funeral-procession)

वाघाडी येथील रामदास बाबुराव सूर्यवंशी या शेतकऱ्याची ही गाय होती. लळा लावला की रानातलं पाखरू देखील मानसाळत तसेच काहीसे या गायीच्या बाबतीत देखील सूर्यवंशी कुटुंबीयांनी लळा लावलेला होता. त्यामुळेच सूर्यवंशी कुटुंबीयांनी सर्पदंशाने मृत पावलेल्या आपल्या लाडक्या गायीचा अंत्यविधी घरातील सदस्याप्रमाणे केला आहे.

गावातील नागरीकही सहभागी

गायीच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याने घरातील सदस्याप्रमाणे या गाईची वाजत गाजत अंतयात्रा गावातून काढली. गाईची अंत्ययात्रा बघून गावातील नागरिक देखील भारावून गेले. गायीच्‍या अंत्‍ययात्रेत गावातील काही नागरीक देखील सहभागी झाले होते.

शेतकरी कुटुंब रडले

कित्येक वर्षांपासून ही गाय घरात होती. गाईच्या दुधावर संपूर्ण कुटुंबीय अवलंबून होते. घरातील सदस्याचा मृत्यू झाला असावा अशा पद्धतीने सर्व कुटुंबीयांनी डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारानी लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT