Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Dussehra Festival Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याच्या पानांना 'सोने' म्हणून देवाणघेवाण करण्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. विजयादशमीच्या या परंपरेमागील कथा जाणून घ्या.
Dussehra Festival  Apatya Leave
Devotees exchanging Apatya leaves as symbolic ‘gold’ on Dussehra festival.saam tv
Published On
Summary
  • दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात.

  • प्रभू रामाने रावणाचा वध याच दिवशी केल्यामुळे विजयादशमी महत्त्वाची.

  • शस्त्रपूजा, वाहन पूजा आणि देवाला विशेष अर्पणाची परंपरा.

दसऱ्याच्या सणाला अनेक झाडांची पानं, फुलं देवाला अर्पण केली जातात. कारण त्या दिवशी ती अर्पण करण्याला विशेष महत्त्व असते. नवरात्रीनंतर विजयादशमी साजरी केली जाते. विजया म्हणजे विजय आणि दशमी म्हणजे दहावा. दहाव्या दिवशी विजयाचा उत्सव. रामायणात विजयादशमीचे महत्त्व आहे.

Dussehra Festival  Apatya Leave
Dussehra Marathi Wishes: दसरा आणि विजयादशमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा आणि मेसेजेस

प्रभू रामाने राक्षस राजा रावणाचा या दिवशीच वध केला होता. दसऱ्याला शस्त्रपूजा केली जाते त्याचबरोबर आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात. आपट्याची पानं का लुटतात आणि सोनं म्हणून का वाटली जातात हे जाणून घेऊ. हिंदू धर्मात आपट्याची पानं एकमेकांना देण्याची प्रथा आहे. एकमेकांना हे सोनं म्हणून वाटतात.

रामायणाच्या पंचम सर्गात रघुवंशामधील कथेनुसार पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राम्हणाला कौत्स नावाचा मुलगा होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या ऋषींच्या घरी शिक्षण घेण्यसाठी गेला होता. काही काळानंतर कौत्स सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झाला. त्याला त्याच्या गुरूला गुरूदक्षिणा द्यायचे.

Dussehra Festival  Apatya Leave
Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, जाणून घ्या पद्धत अन् शुभ मुहूर्त

मात्र दक्षिणेसाठी शिष्यांना विद्या देणे हे योग्य नाही आणि शिष्य विद्वान झाला हीच गुरूदक्षिणा असते, असं त्याचे गुरू त्याला म्हणाले. पण कौत्साला काही हे पटत नव्हते. त्याने गुरुदक्षिणा देण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ऋषी म्हणाले, शिकवलेल्या प्रत्येक विद्येसाठी एक कोटी अशा चौदा कोटी मुद्रा त्याही एकाच व्यक्तीकडून आणून दे. कौत्साने हे मान्य केले.

त्यानंतर कौत्स हा रघुराजाकडे गेला, मात्र त्यावेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ करून ब्राम्हणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटण्यास दिले होते. त्यामुळे तो कौत्साला मदत करण्यास आपण अपात्र असल्याचं म्हटलं. कौत्सला मदत करण्यासाठी रघुराजाने इंद्राबरोबर लढण्याची तयारी केली. ही गोष्ट इंद्राला समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करण्यास सांगितला.

रघुराजाने त्या सर्व कौत्साला दिल्या. ठरल्याप्रमाणे कौत्साने वरतंतू ऋषींपुढे चौदा कोटी मुद्रांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. ऋषींनी १४ कोटी मुद्रा ठेवून बाकीच्या कौत्साला परत केल्या. कौत्साने त्या रघुराजाला आणून दिल्या. मात्र रघुराजा काही त्याचा स्वीकार करत नव्हता. शेवटी त्याच आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांना त्या नेण्यास सांगितलं.

लोकांनी ही संधी साधून नगराच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, यथेच्छ सोनं लुटलं आणि एकमेकांना देऊन आनंदही व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. तेव्हापासून आपट्याच्या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com