
दसरा मेळाव्याच्या खर्चावरून राजकीय वाद पेटला.
भाजपनं 63 कोटी खर्चाचा आरोप केला.
ठाकरेसेनेनं ‘शिवसैनिक स्वतःच्या भाकर्या घेऊन येतो’ असा पलटवार केला.
शिवतीर्थावरील हीच घोषणा ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतो. मात्र यावेळी एकीकडे पूरस्थितीमुळे शेतकऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना होणाऱ्या या दसरा मेळाव्यावरून चांगलचं राजकारण पेटलंय. भाजपनं ठाकरेसेनेच्या दसरा मेळाव्याचं बजेटच जाहीर करून टाकलं. दसरा मेळावा 63 कोटी रुपयांचा असल्याचा दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी X पोस्टमधून केलाय. तर दुसरीकडे आमचा शिवसैनिक मेळाव्यासाठी आपली भाकरी घेऊन येतो? असं म्हणत ठाकरेसेनेनंही पलटवार केलाय.
'ठाकरेसेनेसाठी 9 अंक लाभदायक'
'63 कोटींचा दसरा मेळावा'
'आमचा शिवसैनिक भाकरी घेऊ येतो'
भाजपच्या या आरोपानंतर ठाकरेंसेनेनं शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील खर्चावरही टीका केलीय. दसऱ्याच्या निमित्तानं बीड जिल्ह्यातील नारायणगडावर तब्बल 350 एकरवर जरांगें पाटलांचा दसरा मेळावा होणार आहे. तसचं परळीजवळील भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पारंपारिक मेळावा होत आहे.त्यामुळे या मेळाव्यातील खर्चावरून राजकारण तापलयं.
ओल्या दुष्काळानं आधीच शेतकऱ्याचे संसार उद्धस्त झाले आहेत.परिस्थिती राजकारण करण्याची नाही, असं म्हणणारेच शेताच्या बांधावर जाऊन राजकारण करत असतील, तर नेमकं शेतकऱ्यांचे हाल कोण समजून घेणार? परंपरेनुसार हे पक्षीय मेळावे घेतले जात असले तरी ही वेळ मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन करण्याची नव्हे तर बळीराजाला पुन्हा एकदा उभारी देण्याची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.