Traffic Police 
महाराष्ट्र

खड्ड्यांमुळे वाहतुक पोलिसांना असाही ताप; करावी लागतेच हमाली

खड्ड्यांमुळे वाहतुक पोलिसांना असाही ताप; करावी लागतेच हमाली

भूषण अहिरे

धुळे : शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्याचा फटका वाहनधारकांबरोबरच शहर वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना देखील बसतांना दिसून येत आहे. कांद्याने भरलेल्‍या गाडीचे टायर फुटले अन्‌ दोन्‍ही बाजूंनी रहदारी थांबली. मग काय तर वाहतूक पोलिसांना हमालीचे काम करावे लागले. (dhule-news-damage-road-pickup-van-puncher-and-dhule-traffic-police-help-onion-bag-side)

धुळे शहरातील संतोषीमाता चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे कांद्याने भरलेला पिकअपचे टायर अचानक फुटले. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र टायर फुटल्याने कांद्याने भरलेले पिकअप वाहन रस्त्यातच अडकून पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी..

वाहन रस्त्यात अडकून पडल्यामुळे वाहतूक सुरळीत करणे कठीण होत असल्याने अखेर पोलिसांना टायर फुटलेले पिकअप वाहनामधील कांद्याच्या गोण्या स्वतः हमाली करीत वाहनातून काढून रस्त्याच्या किनारी नेऊन ठेवाव्या लागल्या. पिकअप वाहनातील सर्व कांद्याने भरलेल्या गोण्या पोलिसांनी वाहनातून काढून रस्त्याच्या बाजूला नेऊन ठेवल्यानंतर अखेर टायर फुटलेले पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला केल्यानंतर वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करता आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT