Chinmay Pandit 
महाराष्ट्र

भरस्‍त्‍यात खुन..तासाभरातच लावला छळा

भरस्‍त्‍यात खुन..तासाभरातच लावला छळा

भूषण अहिरे

धुळे : भररस्‍त्‍यात तरुणाचा खुन झाला होता. या खुनाच्या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांना पोलिस अधीक्षकांनी तपास लागला नाही. तर राजीनामा देण्याचे आश्वासन देत तपासाला गती दिली. त्‍यानुसार आश्वासनानंतर तासाभरातच पोलीस अधीक्षकांनी दिलेला शब्द पाळत तीन आरोपींच्या मुसक्या आवळत ताब्‍यात घेतले. (Dhule-news-crime-news-young-boy-murder-case-police-searching-and-case-solve-on-hour)

पोळा सणाचे औचित्य साधून शोरुममधुन नवीन मोटरसायकल घरी आणत असतांना तरुणाचा अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून करत नवीन मोटरसायकल घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली होती. २१ वर्षीय प्रेमसिंग गिरासे असे या मृत तरुणाचे नाव आहे. घरातील कर्ता एकुलत्या एक मुलाचा मृत्यूची घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संतप्‍त नातलगांचा रास्‍ता रोको

प्रेम सिंग गिरासे या तरुणाचा नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी चिमठाणे फाटा या ठिकाणी एकत्र जमून रास्तारोको केला. तरुणाच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी हा रास्ता रोको ग्रामस्थांतर्फे करण्यात आला होता. घटनेची माहिती कळताच धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित हे घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. परंतु नागरिकांचा रोष हा पोलीस प्रशासनावर देखील कायम असल्याचे या रास्तारोको दरम्यान बघायला मिळाले आहे.

भावनिक आवाहनानंतर तपासाला गती

पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी संतप्त ग्रामस्थांना मारेकर्‍यांना पकडण्याचे आश्वासन देत असताना जर मी मारेकर्‍यांना पकडले नाही; तर पोलीस अधीक्षक पदाचा राजीनामा देईल असे भावनिक आवाहन देखील करीत ग्रामस्थांना रास्तारोको थांबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर नागरिकांना पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिलेल्या शब्दाच्या तब्बल तासाभरातच पोलीस प्रशासनाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT