Fake Vaccination
Fake Vaccination saam tv
महाराष्ट्र

Fake Vaccination: लसीकरण बनावट प्रमाणपत्र प्रकरणात मोठे मासे अडकणार?

भूषण अहिरे

धुळे : कोरोनावर नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणात देखील घोटाळा झाला आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमाला धुळे महापालिकेने छेद देत बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा केला. याप्रकरणी शनिवारी पहाटे मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यासह चौघांना अटक झाली. यात त्‍यांना दोन दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली असून यात मोठे मासे अडकण्याची शक्‍यता देखील वर्तविली जात आहे. (dhule news corporation fake corona vaccination certificate case)

कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र (Corona Fake Vaccination) वाटप प्रकरणामध्ये पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये धुळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांचा देखील समावेश आहे. या चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या दोन दिवसांमध्ये या चौघांची पोलिस प्रशासनातर्फे (Dhule Corporation) कसून चौकशी सुरू आहे. आणि यामध्ये आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

राज्‍यात गाजले प्रकरण

बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरण हे राज्‍यात गाजले आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनातर्फे आरोग्य विभागातील आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. परंतु या तपासानंतर आता मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागणार का याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं पहिलं रील; राज्यातील लोकांना केलं मोठं आवाहन

Morning Tips: सकाळची 'ही' सवय ठरते आरोग्यासाठी फायदेशीर,जाणून घ्या

Today's Marathi News Live : सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसकडून कारवाईची शक्यता

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले, पोलीस घटनास्थळी

1st May Maharashtra Din 2024 : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा; महाराष्ट्र दिनाच्या सुंदर शुभेच्छा

SCROLL FOR NEXT