Raj Thackeray: महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं पहिलं रील; राज्यातील लोकांना केलं मोठं आवाहन

Viral Video Of Raj Thackeray: आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अनेक तरुण वर्ग व्हिडिओ तसेच रिल्स बनवत आहेत. आज ६४ वा महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातील पहिलं रिल्स केले आहे.
Raj Thackeray
Raj Thackerayinstagram

आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अनेक तरुण वर्ग व्हिडिओ तसेच रिल बनवत आहेत. आज ६४ वा महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातील पहिलं रिल (Reel)केले आहे. मात्र त्यांच्या रिलमध्ये ते एकटे नाहीत. त्यांच्यासोबत सध्याच्या तरुणाईला वेड लावलेला रिल स्टार 'अर्थव सुदामेही' आहे. या दोघांनी मिळून हे रिल बनवले आपल्याला दिसून येत आहे. सध्या राज ठाकरे आणि अर्थव सुदामें बनवलेले हे रिल सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

Raj Thackeray
Watch Latest News Updates on : Entertainment Special News : 'कुंकू' मालिकेच्या सेटवरील धमाल किस्सा शेअर केला किशोरी आंबियेने | SAAM TV

तुम्हाला ही समजेल असेल राज ठाकरे यांनी रिल नेमके कोणत्या विषयावर केले असले. या रिलमध्ये राज ठाकरे म्हणत आहेत की,''मराठी भाषा रुजवली गेली पाहिजे. आपण मराठी भाषेत कायम बोललं पाहिजे. हिंदी(Hindhi) भाषेत बोलण्याची आवश्यकता नाही''. सध्या सोशल मीडियावर या राज ठाकरे यांना रिलमध्ये पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत तर या व्हिडिओवर प्रत्येक नेटकऱ्यांकडून असंख्य प्रतिक्रिया येत आहेत.

https://saamtv.esakal.com/entertainment/marathi-movie-vitthala-tuch-trailer-released-on-social-media-see-film-trailer-cb99

महाराष्ट्र दिनाचे औचित्य

व्हायरल होत असलेल्या रिल व्हिडिओमध्ये रिलस्टार सुरुवातीला अर्थव म्हणत आहे की, '१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. निर्मिती झाली ती अनेक सीमा आखून दिलेल्या राज्याची नाही तर संस्कृतीची.खरंतर ज्ञानोबा, तुकाराम आणि छत्रपती यांनी महाराष्ट्र घडवला. या दरम्यान राज ठाकरे अर्थवला बोलताना थांबवतात आणि ते बोलतात की,'काय अर्थव कधी आलास,काय चाललंय?'

त्यावर अर्थव त्यांना म्हणतो, १ मे निमित्त जरा छोटंस भाषण आहे. तेच जरास पाठ करण्याचा प्रयत्न करतोय' त्यावर पुन्हा राज ठाकरे अर्थवला म्हणतात,' भाषण पाठ करतोय...बघू..संयुक्त महाराष्ट्र, शाहू, टिळक, फुले , आंबेडकर ,सावरकर, आणि पु.ल.देशपांडे, मंगेशकर, बाळासाहेब, तेंडुलकर व्हा छान यांचे उल्लेख आहेत. आपल्या इतिहास तसेच संस्कृती याबद्दल उत्तम लिहलं आहेस'. ठाकरे यांना अर्थव विचारतो,'साहेब यात काही बदल'.

त्यावर राज ठाकरे अर्थवला म्हणतात की,' यात बदल काही नाही. जे काही लिहिले आहेस उत्तम आहे. पंरतु आपण आज जे काही करतोय ते देखील सांगण गरजेचे आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचे त्यांचे कतृत्व गाजवले आहे आणि आपला महाराष्ट्र मोठा केला. पण आज आपण असं काय करणार आहोत,ज्यामुळे आपला महाराष्ट्र आणखी पुढे जाईल. मला असे वाटते की सध्या त्याचा विचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मराठी भाषा आपण रुजवली पाहिजे. मराठी भाषेतच बोललं पाहिजे. अनेकदा समोरचा हिंदीत बोलल्यावर आपण हिंदीत बोलतो. मात्र त्याची काहीही गरज नाही. परत राज ठाकरे पुढे बोलतात,'अभिमान आणि स्वाभिमान टिकवण प्रत्येकवेळी गरजेचे आहे. तु चांगले काम करत आहेस, माझ्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबत आहेत'. व्हिडिओच्या शेवटला राज ठाकरेंनी अर्थवला शुभेच्छा दिल्यानंतर बॅकग्राऊंडला 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं वाजतं.

Raj Thackeray
Watch Latest News Updates on : Entertainment Special News : 'कुंकू' मालिकेच्या सेटवरील धमाल किस्सा शेअर केला किशोरी आंबियेने | SAAM TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com