धुळे : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना वीज वितरण विभागातर्फे मोठा दिलासा देण्यात आला आहे. ज्या ग्राहकांचे (Dhule News) विद्युत मीटर कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहे; अशा ग्राहकांना थकीत वीज बिल भरून मीटर सुरू करावयाचे असेल तर अशा ग्राहकांना आता थकलेले विज बिल टप्प्याटप्प्याने भरता येणार आहे. (Letest Marathi News)
महावितरणने (Mahavitaran) थकित बिल असलेल्या ग्राहकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत योजनेचा लाभ वीज बिल थकलेल्या ग्राहकांना घेता येणार आहे. ज्या वीज बिल थकीत ग्राहकांचे मीटर्स वीज वितरण विभागातर्फे (MSEDCL) काढून टाकण्यात आले आहे; अशा ग्राहकांना वीज वितरण विभागातर्फे अनोख्या पद्धतीने योजना आखून सुलभतेने वीज बिल भरण्यास सुवर्णसंधी देण्यात आली आहे.
३० टक्के रक्कम भरणे आवश्यक
थकलेल्या वीज बिलावर आकारण्यात येणाऱ्या व्याजात देखील वीज वितरण विभागातर्फे सुट देण्यात येणार आहे. परंतु यासाठी कमीत कमी 30 टक्के रक्कम भरणे आवश्यक असणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर थकलेले विज बिल वीज वितरण कार्यालयाशी संपर्क करून भरावे असे आवाहन देखील वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.