Dhule Saam tv
महाराष्ट्र

Dhule: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शरम करो म्हणत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शरम करो म्हणत धुळ्यात काँग्रेसचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : देशात कोरोना संक्रमण वाढण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना केला होता. प्रधानमंत्रीच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले असून आज धुळ्यात (Dhule) कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. (dhule news Congress agitation in Dhule saying shame on Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कॉंग्रेसबद्दल केलेल्‍या विधानाच्‍या विरोधात धुळ्यातील जुनी महानगरपालिका समोर काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील तसेच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.

कॉंग्रेसने केलीय मदत

महाराष्ट्राने देशाला अनेक वर्षे दिशा दाखवली आहे. देशातील प्रत्येक राज्याला महाराष्ट्राने आपल्या परीने मदत केली आहे. तसेच मदत कोरोना (Corona) काळात देखील महाराष्ट्र काँग्रेसने (Congress) नागरिकांना आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आहे. मात्र नरेंद्र मोदी यांची लोकसभेत बोलताना जीभ घसरली व त्यांनी महाराष्ट्रा काँग्रेसमुळे कोरोनाचा प्रसार झाला; असे चुकीचे विधान केले. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहोत अशी प्रतिक्रिया माजी आमदार शरद पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT