Mahavitaran News
Mahavitaran News SaamTV
महाराष्ट्र

Dhule News: विद्युत खांबाला शॉक लागून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्हीत कैद

साम टिव्ही ब्युरो

>> भूषण अहिरे

धुळे : प्रशासनाचा भोंगळ कारभार चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. विजेच्या खांबामध्ये करंट उतरल्यामुळे जवळच खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकल्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.धुळे शहरातील वडजाई रोड गफुनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

गफुनगर परिसरात या चिमुकल्यासह इतर मुलं देखील खेळत होती. खेळता खेळता चिमुकल्याने विजेच्या खांबाला हात लावला असता त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि यात त्याचा मृत्यू झाला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

हृदय पिळवटून टाकणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळेच या बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप लावत स्थानिकांनी व नातेवाईकांनी संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.  (Latest Marathi News)

परिसरात नेहमीच वीज वितरण विभागाच्या गलथन कारभारामुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागते असा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वीच बहुतांश वेळा परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयामध्ये निवेदन देऊन समस्या सोडवण्या संदर्भात मागणी केलेली असताना, वीज वितरण विभागातर्फे जाणीवपूर्वक सर्व समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

वीज वितरण विभागाच्या याच दुर्लक्षितपणामुळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यास कारणीभूत असलेल्या वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर या संदर्भात कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी वीज वितरण विभागाला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT