Accident saam tv
महाराष्ट्र

Accident: मुंबई– आग्रा महामार्गावर रसायन टँकरला आग; चालकाचा होरपळून मृत्‍यू

भीषण अपघात..मुंबई– आग्रा महामार्गावर रसायन टँकरला आग; चालकाचा होरपळून मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या अपघातानंतर रसायनाच्या टँकरला आग लागली. टँकरला लागलेली आगीने क्षणार्धात रौद्र रूप घेतले. अपघातात टँकरची कॅबिन दबली गेल्‍याने यातून चालकाला बाहेर निघता आले नाही. यामुळे चालकाचा होरपळून मृत्‍यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (dhule news Chemical tanker fire on Mumbai Agra highway driver died on the spot)

मुंबई– आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) सदर अपघात आज (ता.१) दुपारी पळासनेर (ता. शिरपूर) शिवारातील चारणपाडा गावाजवळ घडला. आगीची तिव्रता अधिक असून उशिरापर्यंत विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीमुळे (fire) एकापाठोपाठ टायर फुटून स्फोट झाले. टायरसह टँकरचे भाग फुटून होणाऱ्या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीती पसरली आहे.

काही सेकंदातच आगीच्‍या ज्‍वाला

घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शिरपूरकडे (Shirpur) येणाऱ्या कंटेनरवर टँकर पाठीमागून येणारा टँकर आदळल्याने हा अपघात (Accident) झाला. गतिरोधकावरून उसळल्याने कंटेनरवर आदळून टँकरची केबिन चेपली गेली. चालकाला बाहेर पडणे अशक्य झाले. टँकरमधून रसायनाची गळती सुरू होऊन आग लागली. अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याने काही सेकंदातच आगीच्या ज्वालानी टँकर वेढला गेला. त्याचवेळी एकापाठोपाठ टायर फुटून स्फोटाचे आवाज येऊ लागले. अपघाताच्या भीषणतेमुळे मदतकार्य करण्यात अडथळे येत होते. अपघातानंतर सांगवी पोलिसांसह सेंधवा व शिरपूर येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून पाण्याचा मारा करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT