धुळे : चैत्र उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर धुळे शहरातील खान्देशवासीयांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. (dhule Chaitra Navratri festival Crowd of devotees for darshan at Ekvira Devi temple)
चैत्र उत्सवादरम्यान भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी होत असते. तसेच दर्शनासाठी देखील भाविक मंदिरामध्ये मोठ्या (Dhule News) प्रमाणावर गर्दी करू लागले असल्याचे दिसून येत आहे. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांची दर्शनासाठी वाढती गर्दी लक्षात घेता सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. वाढत्या उन्हाचा त्रास भाविकांना होऊ नये यासाठी मंदिर परिसरामध्ये मंडप देखील उभारण्यात आला असल्यामुळे उन्हाचा त्रास भाविकांना यामुळे काहीसा कमी जानवणार आहे. तसेच मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी वाढत असल्याने मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात येत असून या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून मंदिर परिसरामध्ये मंदिर प्रशासनातर्फे नजर ठेवली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.