Shirpur saam tv
महाराष्ट्र

पोलिसांनी उधळता घरफोडीचा डाव; पाठलाग करत एकास घेतले ताब्‍यात

पोलिसांनी उधळता घरफोडीचा डाव; पाठलाग करत एकास घेतले ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : मध्यप्रदेश राज्यातील दरोडेखोर टोळीचा शिरपूर शहरात कॉलनी परिसरात दरोड्याचा डाव होता. हा डाव मध्यरात्री शहर पोलिसांनी उधळून लावत एका संशयिताला पिस्‍तोलसह ताब्यात घेतल्याची कामगिरी शिरपूर शहर पोलिसांनी (Police) केली आहे. (dhule news Burglary plot foiled by police Chasing and taking one)

शहर पोलिस ठाण्याचे (Shirpur Police) गस्ती पथक मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शहरात गस्तीवर असताना अरिहंत कॉलनी परिसरात दोन दुचाकींवर प्रवास करणारे पाच जण आढळले. त्यातील होंडा शाईन दुचाकीवर बसलेल्या युवकाच्या हातात लोखंडी टॅमी होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकी धारकांना थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी दोन्ही दुचाकीसह संशयित कळमसरे गावाच्या दिशेने पळाले.

पाठलाग करत पकडले

दरम्यान चोपडा (Chopda) रस्त्यावरील अरुणावती नदीच्या पुलावर पोलिसांनी होंडा शाइन दुचाकी चालवणाऱ्यास पकडले. तर मागे बसलेला संशयित अंधाराचा फायदा घेत नदीपात्राच्या बाजूने पसार झाला. तसेच अन्य तीन संशयित दुचाकीवरून पसार झाले. संशयिताकडून पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन स्क्रूड्रायव्हर, लोखंडी टॅमी, प्लॅस्टिक कॅरिबॅगमध्ये मिरची पूड व दुचाकी असा घरफोडीसाठी आवश्यक साहित्यासह मुद्देमाल जप्त केला असून फरार इतरांचा शोध शिरपूर पोलीस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात करा हे दान

SCROLL FOR NEXT