Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : घटस्थापनेपूर्वी घडले दुर्दैवी..देवीला अंघोळीसाठी नदीवर नेले असता बहीण- भावाचा मृत्यू 

भूषण अहिरे

धुळे : नवरात्रोत्सव उद्यापासून सुरु होत आहे. यामुळे घरात घटस्थापना करण्यापूर्वी पुर्वी घरातील कानबाई मातेला तापी नदीत अंघोळ घातली जाते. त्यानुसार देवीला अंघोळीसाठी घेऊन गेलेल्या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी या गावात घडली.  

वैष्णवी पाटील (वय १७) आणि उत्कर्ष पाटील (वय १३) असे नदीत बुडून मृत झालेल्या भावा बहिणींचे नाव आहे. शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील सुरेश अंकुश पाटील व रमेश अंकुश पाटील या दोन्ही भावांचा परिवार घरात घटस्थापना करत असतात. घटस्थापनेपूर्वी ते घरातील कानबाई मातेचे आंघोळीसाठी तापी नदी काठावर गेले होते. यावेळी सुरेश पाटील आणि रमेश पाटील या दोन्ही भाऊंचे कुटूंबातील सदस्य येथे असतांना सुरेश पाटील यांची मोठी मुलगी वैष्णवी पाटील आणि रमेश पाटील यांचा मोठा मुलगा उत्कर्ष पाटील हे दोन्ही तापी नदी काठावर पाण्यात उतरले.  

दोघे बहीण- भाऊ पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने वैष्णवी आणि उत्कर्ष गे दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्या सोबत असलेले त्यांच्या वडिलांना देखील वाचविता आले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. यावेळी दोघांचा शोध कार्य सुरु केले असता घटनेच्या एक तासानंतर उत्कर्ष आणि वैष्णवी या दोघांचा तापी नदीपात्रात मृतदेह मिळून आला आहे. दरम्यान दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alcohol Viral Video: दारूमुळे होतो कॅन्सर? काय आहे सत्य? जाणून घ्या...

Harshvardhan Patil News : शरद पवारांकडून भाजपला सर्वात मोठा धक्का; पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता हाती तुतारी घेणार, वाचा

Maharashtra News Live Updates: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार?

Nashik News : दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Dasara Melava 2024 : रुग्णालयातून डिस्चार्ज, जरांगे थेट मैदानात! आरक्षणासाठी घेणार दसरा मेळावा

SCROLL FOR NEXT