Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Kunal Patil News : कुणाल पाटील यांचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर; कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला दिल्या शुभेच्छा!

Dhule News : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे सलग दोन वेळा धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. तर आता आमदार कुणाल पाटील यांना हॅट्रीकची संधी

भूषण अहिरे

धुळे : धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर आमदार कुणाल पाटील यांचा भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. 

काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे सलग दोन वेळा (Dhule News) धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. तर आता आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांना हॅट्रीकची संधी असल्यामुळे आणि महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत. परंतु आमदार कुणाल पाटील यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारीचे तिकीट निश्चित मानले जात असले, तरी आगामी काळात काय चित्र असणार; हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. तरी देखील अशाप्रकारचे बॅनर लावण्यात आले आहे. 

शहरात ठिकठिकाणी बॅनर 

आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे हे बॅनर धुळे ग्रामीण व धुळे शहरात झळकले असून, अनेक बॅनरवर आमदार कुणाल पाटील यांचा भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वीच त्यांचे भावी कॅबिनेट मंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले असून या बॅनरमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT