सुभाष देसाई 
महाराष्ट्र

५५ वर्षांपासून आम्‍ही आव्‍हान पेलतोय; उद्योगमंत्री सुभाष देसाई

५५ वर्षांपासून आम्‍ही आव्‍हान पेलतोय; उद्योगमंत्री सुभाष देसाई

भूषण अहिरे

धुळे : औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरच्‍या मुद्यांवरून इम्तियाज जलील यांना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिउत्तर देताना ५५ वर्षांपासून आव्‍हान पेलत असल्‍याचे म्‍हटले आहे. (dhule-news-aurngabad-change-name-issue-been-challenging-for-55-years-Industry-Minister-Subhash-Desai)

राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आज धुळ्यात व्यापारी संकुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी मंत्री देसाई यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्यावरून खासदार इम्तियाज जलील यांना धुळ्यात प्रत्युतर दिले आहे. असे आव्हान आम्ही गेल्या ५५ वर्षांपासून पेलत आहोत. शिवसेना काही आज कालची नाही. गेल्या पंचावन्न वर्षांमध्ये असे भरपूर आव्हान पेलत शिवसेनेने विरोध करणाऱ्यांना भुईसपाट केले आहे. असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांना त्यांचा पक्ष शिवसेनेसमोर नवीन असल्याचे म्हणून टोला लगावला आहे.

प्रशस्त संकुलाचे नियोजन

धुळ्यामध्ये व्यापारी संकुलाचे उद्घाटनप्रसंगी बोलताना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी साठवणुकीसाठी जर प्रशस्त जागा असली तर शेतीमाल हा साठवणूक करताना खराब होत नाही. मालाची साठवणूक दीर्घकाळ करता येते म्हणून धुळ्यात जवळपास शंभर व्यापाऱ्यांना आपला माल साठवता येईल. एवढ्या प्रशस्त संकुलाचे नियोजन केले असल्याचे देखील मंत्री देसाई त्यांनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? 'या' चुका आहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: नागपुरात उद्या शांतता मार्च, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! वऱ्हाडाच्या बसची कंटेनरला धडक; १० ते १२ प्रवासी गंभीर, पाहा VIDEO

Ramesh Mhatre : मोठी बातमी! नगरसेवक रमेश म्हात्रेंना कोर्टाचा दणका, शरण येण्याचे आदेश

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

SCROLL FOR NEXT