Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मुंबई– आग्रा महामार्गावर लुटमारीचा प्रयत्‍न; दोन ट्रकवर केली दगडफेक

मुंबई– आग्रा महामार्गावर लुटमारीचा प्रयत्‍न; दोन ट्रकवर केली दगडफेक

भूषण अहिरे

धुळे : मुंबई– आग्रा महामार्गावर लुटारुंच्या टोळीचा हैदोस सुरू आहे. रात्रीच्‍यावेळी ट्रक किंवा कारवर दगडफेक करून लुटमार (Crime News) करण्याचा प्रयत्‍न होत आहे. असाच प्रकार समोर आलाप असून कांद्याने भरलेल्‍या ट्रकवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्‍न झाला आहे. (Live Marathi News)

धुळे (Dhule News) शहरापासून काही किलोमीटर अंतरावर मुंबई- आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) लुटारुंच्या टोळीने महामार्गावरील वाहनांवर हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. या हल्ल्यात ट्रक अपघातग्रस्त तर आयशरट्रकचे देखील काचा फोडून नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. लुटीच्या उद्देशाने ट्रकवर दगडफेक केल्याने ट्रक चालकास काचफुटून दगड तोंडाला लागला.

ट्रक झाला पलटी

कांद्याने भरलेल्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यावरतीच पलटी झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लुटारुंच्या टोळीचा हा हैदोस बघावयास मिळाला असून या टोळीने वाहनचालकास लुटून पोबारा देखील केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व हायवे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीचा झालेला खोळंबा सुरळीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

SCROLL FOR NEXT