Kidnapping News, Dhule Latest Marathi News Updates, Dhule News Updates Saam tv
महाराष्ट्र

प्रेम संबंधाचा संशय; गाडीच्‍या डिक्‍कीत टाकून युवकाच्‍या अपहरणाचा प्रयत्‍न

प्रेम संबंधाचा संशय; गाडीच्‍या डिक्‍कीत टाकून युवकाच्‍या अपहरणाचा प्रयत्‍न

साम टिव्ही ब्युरो

सोनगीर (धुळे) : प्रेम संबंधाच्या संशयावरून एकाचे अपहरण करून त्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत पळवून नेल्याची घटना येथे घडली. मात्र काही मजुरांना संशय आल्याने त्यांनी अपहरण होत असलेल्या युवकाची सुटका केली. या प्रकरणी सोनगीर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (dhule news Attempt to kidnapping young man suspicion of a love affair)

चितोड (ता. धुळे) येथील संदीप गायकवाड याचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून महेंद्र नवसारे याने संदीपला सोनगीर (Songir) येथील त्याच्या सासऱ्याच्या घरी बोलविले. रविवारी (ता. २४) सकाळी दहाच्या सुमारास संदीप सोनगीरला गेला असता महेंद्र नवसारे, भूपेश कोळी व यश कोळी (रा. सोनगीर) यांनी संदीपला नवसारे याच्या सासऱ्याच्या घरात डांबून बेदम मारहाण, कोयत्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याला कारच्या डिक्कीत (एमएच ०४ एक्स ४६९०) कोंबून अपहरण केले. (Dhule Latest Marathi News Updates)

मजुरांना संशय आल्‍याने गाडी अडविली

संदीप जिवाच्या आकांताने मदतीसाठी आरडाओरड करीत असताना गोंदूरजवळ रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांना संशय आल्याने त्यांनी कार अडवून चौकशी केली. मजुरांनी धुळे पश्चिम पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचालक महेंद्र नवसारेसह डिक्कीत कोंबलेल्या संदीप गायकवाडला ताब्यात घेतले. मुळ घटना सोनगीर पोलिस ठाणे अंतर्गत घडल्याने सोनगीर पोलिसांनी पुढील सूत्रे सांभाळली. संशयित महेंद्र नवसारेला ताब्यात घेत संदीप गायकवाडची फिर्याद नोंदवून घेतली. संशयित महेंद्र नवसारे, भूपेश कोळी व यश कोळी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक रवींद्र महाले तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

SCROLL FOR NEXT