Shirpur News
Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

धक्‍कादायक..रुग्णवाहिकेतून जनावरांची तस्करी; एका गायीचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : जनावरांची अवैध वाहतूक करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायक बाब बुधवारी (ता. ३१) शहर पोलिसांनी (Police) केलेल्या कारवाईदरम्यान उघडकीस आली. लहानशा जागेत दाटीवाटीने कोंबल्यामुळे एका गायीचा गुदमरून मृत्यू झाला, तर तीन गायीदेखील मृत्यूपंथाला लागल्या आहेत. या कारवाईत एकूण दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी एकाला अटक केली. (Dhule Shirpur News)

महामार्गावरून मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) बोराडीमार्गे धुळे येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यांनी बुधवारी पहाटे वाडी (ता. शिरपूर) गावाजवळ सापळा रचला. बोराडीकडून (Shirpur) शिरपूरकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेचा वेग पोलिसांना पाहून वाढल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पाठलाग करून रुग्णवाहिका (Ambulance) थांबविली. रुग्णवाहिकेची झडती घेतल्यानंतर सात गायी दाटीवाटीने कोंबल्याचे आढळले. त्यांची अवस्था पाहून पोलिसांनी धुळे (Dhule) येथील नवकार पांजरापोळ गोशाळेच्या वाडी येथील शाखेत वाहन नेले.

चालकास अटक

गोसेवकांनी तपासणी केल्यावर एक गाय मृतावस्थेत आढळली. तीन गायींची अवस्था अत्यंत गंभीर आहे. चालक विजय पौलाद चव्हाण (वय २३, रा. महू, जि. इंदूर, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. फोर्स कंपनीची रुग्णवाहिका (एमपी ०९, एफए ४५९३) व गायींसह एकूण दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, हवालदार हेमंत पाटील, हेमराज पाटील, शिपाई भूषण कोळी, नाना अहिरे, भाऊसाहेब मालचे यांनी ही कारवाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malshej Ghat Accident: मोठी बातमी! माळशेज घाटात भीषण अपघात; पती पत्नीसह चौघांचा मृत्यू

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

SCROLL FOR NEXT