महाराष्ट्र

धुळ्यात डेंग्यू, मलेरियाचे संकट

भूषण अहिरे

धुळे : कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर धुळेकरांसमोर डेंग्यू, मलेरिया, चिकणगुनिया सारख्या साथीच्या आजारांचे संकट उभे आहे. (Dhule-news-after-coronavirus-dengue-maleriya-fiver-patient)

धुळ्यामध्ये कोरोनाचा कहर हळू हळू कमी झाल्यानंतर आता साथीच्या आजारांनी डोकं वर काढल आहे. त्यामुळे नागरिक साथीच्या आजारांमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. विविध ठिकाणी अधुन-मधुन होत असलेल्या रिमझिम पावसामुळे चिखलमय वातावरण झालेले असून त्यामध्येच दिवसेंदिवस पडून असलेल्या कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार तयार करणारे डास मच्छर वाढू लागले आहेत. यामुळेच पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत उपायोजना करण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

दुर्लक्षितपणामुळे साथीचे आजार

दवाखान्यांमध्ये डेंग्यू- मलेरिया त्याबरोबरच चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट जसं तसं कमी झाल्यानंतर आता पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे साथीच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

दवाखान्याचा खर्च पेलवेना

कोरोनामुळे आधीच हातचे काम गेल्यामुळे नागरिकांवर बेरोजगारीची वेळ ओढवली असताना या साथीच्या आजारांचा खर्च पेलावन नागरिकांना असह्य झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून या संदर्भात नागरिकांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपना वर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार?

Nashik News : दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Dasara Melava 2024 : रुग्णालयातून डिस्चार्ज, जरांगे थेट मैदानात! आरक्षणासाठी घेणार दसरा मेळावा

Laddu Mutya Baba : लड्डू मुत्या बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर

India Travel : भारतातील 'या' 2 ठिकाणी येईल परदेशाचा अनुभव

SCROLL FOR NEXT