Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई; १६ गुन्हे दाखल, साडेतीन लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

साम टिव्ही ब्युरो

पिंपळनेर (धुळे) : लोकसभेची आचारसंहिता लागल्याने पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणी करत कारवाई केली जात आहे. (Dhule) यात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत सोळा गुन्हे दाखल केले आहेत. तसेच गावठी हातभट्टीची दारू व कच्चे रसायन असा साधारण तीन लाख ६० हजार ३६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करून कारवाई केली. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे व पोलिस (Police) अधीक्षकांनी घेतलेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी कारवाई केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैधरीत्या गावठी दारू बनविणारे व विक्री करणारे तसेच विनापरमिट देशी- विदेशी मद्य विकणारे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साडेतीन लाखाचा मुद्देमाल नष्ट 

पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी तसेच गुजरात सीमेलगतच्या गावांमध्ये हातोडे चालवून दारूबंदी कायद्यान्वये आताप्रयंत १६ गुन्हे दाखल केले. तसेच गावठी हातभट्टीची दारू व कच्चे रसायन पाच हजार ४६८ लिटर व देशी-विदेशी मद्य ५२.४२ लिटर असा एकूण तीन लाख ६० हजार ३६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट, हस्तगत करून कारवाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : वादळामुळे भीमा नदीत बोट उलटली; ५ जण बुडाल्याची माहिती

Pune Car Accident: न्यायालाही पैशासमोर झुकावं लागतंय, मोदी दोन भारत बनवत आहेत; पुणे अपघात प्रकरणावरून राहुल गांधी आक्रमक

PM Kisan: भोंगळ कारभार! अमरावतीमधील PM Kisan लाभार्थ्यांचे पैसे गेले जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात

Madhya Pradesh News: स्विमिंग पूलमध्ये स्टंटबाजी जीवावर बेतली, पाण्यात पडला पण बाहेर आलाच नाही; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Mumbai Lok Sabha News | निवडणूक संपताच,मद्यपींची दारू दुकानाबाहेर गर्दी!

SCROLL FOR NEXT