Dhule News Saam tv
महाराष्ट्र

90 धारदार शस्त्रासह चौघे ताब्‍यात; कारमधून अवैध वाहतूक

90 धारदार शस्त्रासह चौघे ताब्‍यात; कारमधून अवैध वाहतूक

भूषण अहिरे

धुळे : सध्या संपूर्ण राज्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या भाषणातून अराजकता निर्माण होण्यासारख वातावरण झालेल असताना अशा परिस्थितीमध्ये धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरून (Mumbai Agra Highway) एका स्कार्पियो कारमधून जवळपास 90 धारदार शस्त्र वाहून नेले जात असल्याचे आढळून आले आहे. (dhule news 90 sharp weapons with four porson arrested)

सोनगीर पोलिसांना (Police) गस्तीच्या वेळी संशयास्पद स्कार्पिओ कार आढळल्यामुळे कार चालकाला कार थांबविण्यासंदर्भात सांगण्यात आले. परंतु कार चालकाने पोलिसांकडे लक्ष न देता स्कार्पिओ कार आणखीन भरधाव वेगाने जोरात पळवली. पोलिसांनी या स्कार्पिओ कारचा पाठलाग करीत त्या कारला अडवले. या कारची झडती घेतली असता त्यामध्ये जवळपास 80 धारदार शस्त्र पोलिसांना आढळून आले आहेत. या संदर्भात कारमध्ये असलेल्या चौघांना या सर्व धारदार शस्त्र व कार पोलिसांनी ताब्यात घेतले.

पुढील तपास सुरू

या शस्त्रासंदर्भात पोलिसांनी विचारणा केली असता हे शस्त्र चित्तोडगड येथून जालनाकडे (Jalna) नेले जात असल्याची माहिती समोर आली आहे. आता ही शस्त्र कुठल्या मोठ्या घातपाताच्या उद्देशाने नेली जात होती का यादृष्टीने धुळे पोलीस या संदर्भातील पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT