Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : १०० हुन अधिक फटाके फोडणारे सायलेन्सर दाबले बुलडोजरखाली; धुळे पोलिसांची कारवाई

Dhule News : रस्त्यावरून जाताना कर्णकर्कश्य आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसवून मिरवणाऱ्या बुलेट धारकांवर गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात येत होता

भूषण अहिरे

धुळे : कर्णकर्कश्य आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलडोझर धारकांवर कारवाई करत जप्तीची कारवाई करण्यात आली होती. (Dhule) ही जप्त करण्यात आलेले सायलेन्सर पोलीस प्रशासनाकडून आज बुलडोजरखाली ठेवून नष्ट करण्यात आले. (Breaking Marathi News)

रस्त्यावरून जाताना कर्णकर्कश्य आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसवून मिरवणाऱ्या बुलेट धारकांवर गेल्या काही दिवसांपासून (Dhule Police) पोलीस प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात येत होता. या कारवाईदरम्यान जप्त केलेले जवळपास १०० हून अधिक सायलेन्सर आज (Police) पोलीस प्रशासनाच्या वतीने बुलडोझरच्या माध्यमातून नष्ट करण्यात आले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरामध्ये आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जप्त करण्यात आलेले सायलेन्सर बुलडोझर खाली चिरडण्यात आले आहेत. कर्णकर्कश्य आवाज करत दहशत निर्माण करत तसेच दवाणी प्रदूषण केले जात असते. अशा वाहनधारकांवर यापुढे देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT